संगणक विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या कार्यालय व ग्रंथालयातील कर्मचार्यासाठी संगणक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.
या संगणक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.व्ही. लोणीकर यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून उप-प्राचार्य श्री. सी.डी. भंडारी हे होते.
या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख अतिथी उप-प्राचार्य श्री. सी.डी. भंडारी यांनी संगणकाचे महत्व उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.